GAVLANI MARATHI LYRICS – गवळण Krishna Bhajan

Gavlani Marathi Lyrics : Lord krishna bhajans in Marathi Lyrics. Song presented on Youtube.



Gavlani Marathi Lyrics

गवळण मथूरेला निघाली…(3)
कशी भूल पडली मला..(2)
गवळण मथूरेला निघाली….(3)….||धृ.||
नेसले पितांबर शालू गं बाई
नेसले पितांबर शालू
कृष्णा माझ्यासंगे आता नको बोलू…..(2)
खेळ होईल तूझा रे, वेळ जाईल माझा….(2)
मग राग हवा कशाला..(2)
गवळण मथूरेला निघाली…..(3)…..||1||
पेंद्या सूदामाची जोडी बरोबरी हो…..(2)
फोडीती आमूच्या उतरंडी…..(2)
सासू बोलेल मला रे, शिव्या देईल तूला…(2)
मग राग हवा कशाला?…(2)
गवळण मथूरेला निघाली…(3)…..||2||
अनयातीही मी गवळण राधा, गवळण राधा….(2)
विसरून गेले घरकाम धंदा…(2)
निळा म्हणे रे श्री हरी, नको वाजवू बासरी…(2)
तूझ्या मूरलीने जीव वेडावला…(2)
गवळण मथूरेला निघाली…(3)….||3||
Gavlani-Marathi-Lyrics

Leave a Comment

error: Content is protected !!